'अजब मुलांच्या गजब गोष्टी' या बालकथांचे हे दुसरे पुस्तक आहे.
यातील मुले अगदी खर्या अर्थाने अजब आहेत आणि त्यांच्या कथाही गजब आहेत.
१. अनोखी दुर्बिण : चेतन एक शहरी मुलगा आहे व समुद्रकिनारी फिरायला गेला असता समुद्रकिनार्यावर त्याला एक दुर्बिण सापडते. ती दुर्बिण थोडी अनोखी आहे. तिच्या मदतीने चेतन व त्याचा मित्र गगन काय काय अनुभवतात व काय करामती करतात हे या पुस्तकात तुम्हांला वाचायला मिळेल.
२. सप्तमची गोष्ट : सातव्या मुलाचा सातवा मुलगा असलेला सप्तम नावाचा मुलगा अजब आहे. त्याला वारा, पशु-पक्षी व माशांची भाषा कळते. या त्याच्या विशेषतेमुळे त्याला काय अनुभव येतात व त्याचे भाग्य कसे उजळते या कथेत वाचता येईल.
३. पांढरी मांजर : ही पांढरी चिनी मातीची छोटी मांजर मानवच्या घरात पिढ्या न पिढ्या कपाटात असते. मानव तिला बाहेर काढतो व ती त्याच्या आवडीची बनते. त्यानंतर ती मांजर त्याच्याशी बोलू लागते. काही जादुही करते. एवढेच नाही तर त्यांचे घरही वाचवते. ते कसे हे या गोष्टीत वाचा.